सिंधुदुर्गनगरी येथे आज पत्रकार दिन सोहळा..

सिंधुदुर्गनगरी येथे आज पत्रकार दिन सोहळा..

 

सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यात जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केलेले पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या शिवाय पत्रकारांच्या गुणवंत मुलांचाही गौरव करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील ईच्छापुती गोविंद मंगल कार्यालय येथे पञकार दिन कायकमाचे आयोजन केले आआहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर,  जि प  सदशय अकुश जाधव  प. स. सदस्य सुप्रिया वालावलकर, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, ओरोस सरपंच प्रिती देसाई व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी या दिवशी दर्पण नावाचे पहिले मराठी नियतकालीक सुरू केले. त्यानिमित्त 6 जानेवारी हा पत्रकार दिन साजरा केला जातो. त्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक माधव कदम यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक लिहीले असून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पत्रकार व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे कार्यवाह उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव संजय वालावलकर यांनी केले आहे.

आदर्श पत्रकार पुरस्कार संदीप गावडे यांना, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिनेश परब यांना, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार महोदव परांजपे यांना, उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार दिनेश साटम यांना आणि ज्येष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट स्मृती विशेष पुरस्कार तेजस देसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा