You are currently viewing सरपंच आरक्षण सोडत 15 जानेवारी 2021 नंतर होणार

सरपंच आरक्षण सोडत 15 जानेवारी 2021 नंतर होणार

 – उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)                            

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यासाठी सरपंच पदासाठी आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पध्दतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षरण सोडत दि. 16 डिसेंबर 2020 रोजी तालुक्यांच्या मुख्यालय ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. दि. 15 जानेवारी 2020 नंतर सरपंच आरक्षण सोडतची तारीख जाहिर करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांनी कळविले आहे.

मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपत असलेल्या  ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत बाबतीत ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्रातील सूचनानुसार ही सोडत दिनांक 15 जानेवारी 2020 नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =