आयी रस्त्यावर खड्ड्याचें साम्राज्य*
माटणे येथे रस्ता धोकादायक, वाहन चालकात संताप*
दोडामार्ग
तालुक्यातील दोडामार्ग शहरांतून आयी गावाकडे जाणारा रस्ता खड्ड्यात गेला असून माटणे येथे तर वाहन कसे चालवावे हा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने ठेकेदाराच्या कामाविषयी व या रस्त्याच्या दर्जाविषयीं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ मलई लाटण्यात व्यस्त असून त्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होतं आहे,
*मणेरी कलमठाणा येथेही रस्ता खड्डेमय*
मणेरी कलमठाणा येथेही रस्त्याचा प्रश्न गंभीर असून जठार बाबा मंदिरा समोरील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे, तर एका बाजूने साईड पट्टी चिखलमय झाल्याने वाहने या चिखलात रूतून अपघात होण्याचा धोका आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जांभ्या दगडाने हे खड्डे बुजावण्याचा प्रयत्न केला मात्र अति पावासाने ते खड्डे पूर्वपदावर आले आहेत. या दोडामार्ग – बांदा मार्गांवर वाहन चालक तारेवरची कसरत करत वाहने हाकत आहेत.