You are currently viewing डेगवे श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात समयी नृत्याचा कार्यक्रम संपन्न..!

डेगवे श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात समयी नृत्याचा कार्यक्रम संपन्न..!

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध वाडीनिहाय सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यात प्रतिदिन श्री माऊली, ब्राह्मणी पंचायतन देवता़ची पुजा करणे,  पुष्पहार घालणे, सकाळी,संध्याकाळी आरती करणे, भजन, किर्तन सादर करणे, भजनाची डबलबारी करणे..दशावतारी नाट्यप्रयोग सादर करणे, धनगरी नृत्य, समयी नृत्य सादर करणे इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

समयी नृत्याचा कार्यक्रम श्री ब्राह्मणी, इश्वटी प्रासादिक भजन मंडळ, आंबेखणवाडी यांनी आज प्रायोजित केला होता. सदर “समयी नृत्याचा” कार्यक्रम श्री.सातेरी महिला मंडळ, हसापूर, पेडणे, गोवा यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे सदर महिला मंडळाचा सन्मान डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई, इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विनय देसाई,विलास देसाई,शामसुंदर देसाई,दिपक देसाई,वामन देसाई,योगेश मांजरेकर,गोपाळ देसाई वासुदेव देसाई, व इतर डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,गावातील मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमात डेगवे आंबेखणवाडी, फणसवाडी, जांभळवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी,वराडकरवाडी इत्यादी वाडी वस्ती वरील ग्रामस्थांच्या भजन मंडळांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळी,महिला यांची उपस्थिती उल्लेखनीय असल्याने नवरात्रातील वातावरण रममाण आहे.

*उल्हास देसाई*
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + two =