You are currently viewing वैभववाडी – निमअरुळेत गवारेडा आढळला मृतावस्थेत

वैभववाडी – निमअरुळेत गवारेडा आढळला मृतावस्थेत

वैभववाडी

निमअरुळे बौद्धवाडी येथे गवारेडा मृत अवस्थेत आढळून आला आहे. मात्र गव्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मते सदर गव्याचा मृत्यू हा अती उष्णतेने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

आज सकाळी बौध्दवाडी नजीक मृतावस्थेत गवारेडा स्थानिक ग्रामस्थांना आढळून आला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक अमीर काकतीकर, वनरक्षक उत्तम कांबळे, वनरक्षक नंदू लोखंडे, समाधान वाघमोडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. कर्पे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मृत गव्याचा पंचनामा केला. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.

यावेळी निमअरुळे सरपंच सविता कदम, अरुळे सरपंच उज्ज्वल नारकर, पोलीस पाटील अंकुश अंगवलकर, सूर्यकांत बोडके व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =