सावंतवाडी :
श्री.देवी माऊली गिरोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोस दांडेली ता. सावंतवाडी. या देवस्थान कमिटीचा पाच वर्षाचा कार्यकाळ दिनांक ०२/०७/२०२४ रोजी संपल्याने पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी आरोस ग्रामपंचायतीच्या वतीने आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी श्रीदेव गिरोबा मंदिराच्या सभागृहात सरपंच श्री.शंकर विष्णू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक श्री अर्जुन कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत करून देवस्थान कमिटी निवड करणे बाबतचे नियम व कार्यप्रणाली सर्वांसमोर मांडली. कमिटीचे सचिव श्री सिद्धेश नाईक यांनी कमिटीचा मागील पाच वर्षांमध्ये झालेला जमा खर्च सभेमध्ये मांडला. अध्यक्ष श्री शंकर नाईक यांनी श्री. गिरोबा मंदिर जिर्णोद्धाराचे काम हे सत्तर टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले.
सदर कमिटीचे हे मागील पाच वर्षाचे काम हे अतिशय चांगले झालेले असून पुढील काळातही सदर ह्याच कमिटीला काम करण्याची संधी द्यावी असे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री नारायण मोरजकर यांनी सुचविले त्यांना श्री.शरद नाईक यांनी अनुमोदन दिले.आणि विद्यमान कमिटीच्या फेरनिवडीचा ठराव सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कमिटीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष शंकर विष्णू नाईक, उपाध्यक्ष गजानन जगन्नाथ परब, सचिव सिद्धेश बुधाजी नाईक, खजिनदार श्रीधर यशवंत नाईक, सदस्य तानाजी वामन खोत, सदस्य शांताराम भिवा नाईक, सदस्य प्रसाद जयराम नाईक, सदस्य गुरुनाथ साबाजी नाईक, सदस्य सत्यवान प्रभाकर नाईक, सदस्य बाळाजी रामचंद्र अभ्यंकर, सदस्य शांताराम नवसो आरोलकर, सदस्य आनंद शशिकांत नार्वेकर, सदस्य प्रकाश विठ्ठल नाईक, सदस्य विश्वास अंकुश मोरजकर, सदस्य गुरुनाथ बोंबडो आरोसकर यांची निवड करण्यात आली. यावेळी आरोस दांडेली गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान मानकरी आदी उपस्थित होते.