You are currently viewing माझा नाशिक जिल्हा

माझा नाशिक जिल्हा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझा नाशिक जिल्हा* 

 

ऋशी मुनींची तपोभुमी

जिल्हा माझा नाशिक

कुंभ मेळयासाठी जमती

सगळे येथे भाविक

 

शुर्पनखेचे नाक कापले

लक्ष्मणाने तपोभूमी

म्हणून नाशिक नामे म्हणती

हीच आमची जन्मभूमी

 

चौदा वर्षे वनवासाची

राम-सिता लक्ष्मणाने

याच नगरी वसती आरण्ये

दुःख त्यांचे कुणी न जाणे

 

ब्रह्मगिरीच्या कुशीत घेई

जन्म गोदावरी माई

हिंदू धर्म देवतुल्य ही

कुशावर्तीची शुभ पुण्याई

 

आदिशक्ति आदिदेवता

सप्तशृंगी रेणुका माता

सालेर-मुल्हेर डोंगर रांगा

किल्ल्यांची तर नावे सांगा

 

मुंबई आग्रा वळणावरती

ओझर आहे ज्याचे नाव

मिग विमाने तयार होती

जगात मोठे त्याचे नाव

 

निवास ज्यांचे नाशिक नगरी

कुसुमाग्रज ते थोर कवी

लाभले आम्हास भाग्य भारी

पावले त्यांच्या पावलांवरी

 

रामदास स्वामी गावी टाकळी

तप साधना घनदाट जाळी

नोट छापती एके काळी

राज्यात फिरे लक्ष्मीची जाळी

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा