You are currently viewing डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे देणार पुन्हा दोडामार्ग रुग्णालयात सेवा

डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे देणार पुन्हा दोडामार्ग रुग्णालयात सेवा

डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे देणार पुन्हा दोडामार्ग रुग्णालयात सेवा

तर दुसरे स्त्रीरोगतज्ञ म्हणून डॉ.धीरज सावंत ही येणार, प्रत्येकी २ दिवस असणार उपस्थित*

दोडामार्ग

दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात गेले अनेक दिवस वैद्यकीय सेवा सुरळीत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यातच एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप झाला होता, यावर माजी प स उपसभापती लक्ष्मण नाईक तसेच दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी “रुग्णालय बंद!” आंदोलनाचा इशारा दिला आहे, यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या बाबत प्रशासकीय आणि तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे म्हणत पत्रातून आंदोलन स्थगित करण्याची विनंती माजी उप सभापती लक्ष्मण नाईक व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना केली आहे.

तर त्यांनी या रुग्णालयात अगोदर सेवा देत असलेले डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे हे मंगळवार व गुरुवार तर डॉ. धीरज सावंत हे बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी रुग्णांना दोडामार्ग रुग्णालयात सेवा देतील असे म्हटले आहे, तसेच डॉ.आकांश फडके हेही रुग्ण तपासणीसाठी उपस्थित असतील असे पत्रात म्हटले आहे. या नेमणुका होण्यास शालेय शिक्षण मंत्री व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे तसेच हे आंदोलन मागे घ्यावे आपण या प्रश्नी लक्ष घालू असे सांगीतल्याचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस म्हणाले.

एकूण पाहता या रुग्णालयाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असून हे रुग्णांना सेवा देणारे या पंचक्रोशीतील एकमेव रुग्णालय असल्याने अशाप्रकारचे रुग्णलय बंद आंदोलन न छेडण्याची विनंती करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज भेडशी येथे दीपोत्सव समितीच्या दिपरंग कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्ये या आरोग्याच्या प्रश्नावर व उद्याच्या आंदोलनाचा पार्श्वभूमीवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + six =