बांदा दारु वाहतूक प्रकरणी दोषींवर कारवाई होणार…

बांदा दारु वाहतूक प्रकरणी दोषींवर कारवाई होणार…

पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम…

बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्य दारु वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही कडक कारवाई केली नाही.  या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित पोलीस कर्मचारी याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे संलग्न करुन घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी दिली.

या प्रकरणातील अधिकारी व कर्मचारी यांचा लेखी खुलासा मागविण्यात आलेला  आहे. त्याचप्रमाणे संबंधिताची खातेनिहाय प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांना आदेशित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा