You are currently viewing कणकवली भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू

कणकवली भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू

कणकवली : ​

कणकवली नगरपंचायत मार्फत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्यांबाबत जाहीर केलेल्या मोहिमेचा शुभारंभ अखेर आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित सोमवारी करण्यात आला. कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी भटके कुत्रे पकड मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. दिवसाला किमान ​४० कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणची व लसीकरणाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले. कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन यांच्या या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. या एजन्सीला नगरपंचायत ने कुत्रे पकड मोहीमेच्या कामाचा ठेका दिला असून या कंपनीच्या दोन डॉक्टरांसह अकरा जणांचे पथक कणकवलीत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत ला या प्रश्नी सहकार्याचा हात पुढे केला असून नितेश राणे यांच्यामार्फत हॉटेल नीलम कंट्री साईड मागील बाजूची त्यांची स्वतःची जागा विनामूल्य नगरपंचायत वापरण्यासाठी दिली आहे. ज्याठिकाणी एजन्सी कुत्रे पकडणार तेथेच त्या कुत्र्याची डिटेल नोंदवून घेत त्यांना मुख्य सेंटरवर नेण्यात येणार. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या कुत्र्यांवर लसीकरण करण्यात येणार व पकडून पुन्हा सोडण्यापूर्वी त्या कुत्र्यांच्या कानाला व्ही आकाराचा कट केलेला भाग असणार आहे. त्यामुळे एकदा पकडलेला कुत्रा पुन्हा पकडावा लागू नये यासाठी ही उपाययोजना असणार आहे. एकदा पकडलेला कुत्र्यांवर तीन दिवस पूर्ण उपचार करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येणार आहे. या एजन्सीकडून जाळी द्वारे कुत्रे पकडण्यात येणार असून कणकवलीतील सुमारे एक हजार कुत्रे पकडुन त्यांच्यावर ॲंटी रेबिज लसीकरण व निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुदा ही पहिलीच मोहीम असणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलेली घोषणा सत्यात आणली आहे. त्यामुळे येत्या काळात कणकवलीक​रांना भटक्या कुत्र्या पासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे​. ​

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 14 =