You are currently viewing सिंधुदुर्गाच हृदय म्हणजे ‘कणकवली’ – सुरेश प्रभू

सिंधुदुर्गाच हृदय म्हणजे ‘कणकवली’ – सुरेश प्रभू

कणकवली भाजपा कार्यलयाला प्रभू यांनी दिली भेट….

कणकवली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाने व जगाने स्वीकारलेले नेतूत्व आहे. त्या नेत्यांचे आणि भाजपा पक्षाचे विचार घेऊन कामकरणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी ज्या धडाडीने काम केले तसेच काम आमदार नितेश राणे कणकवली- देवगड-वैभववाडी मतदार संघात करत आहेत. प्रगल्भ नेतूत्व आपल्या मतदार संघाला लाभलेले आहे. तर सिंधुदुर्गाच हृदय म्हणजे कणकवली असून भाजपाचे आपण सर्व पदाधिकारी कार्यक्रत्ये अभ्यासू आहात. मी तुमच्या सोबत आहे. सर्वांच्या क्षमतेचा वापर करून, सर्व एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेले कोकण घडवूया, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

भाजपाच्या कणकवली येथील जिल्हा कार्यलयाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली. यावेळी भाजपा आमदार नितीश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी ना. प्रभू यांनी संवाद साधत केंद्र सरकारच्या योजनांवर चर्चा केली. यावेळी सौ.उमा प्रभू सोबत होत्या.

तसेच यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवक जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहर अध्यक्ष साक्षी वाळके, कणकवली तालुका महिला उपाध्यक्ष संजना सदडेकर, बाबा वर्डेकर, रवींद्र शेट्ये,सुहास सावंत, आदी उपस्थित होते.

कणकवली आल्यानंतर गावचा एक मुलगा परदेशी गेला तरी त्याची गावची ओढ कायम राहते. २५ वर्षे आम्ही सर्व एकत्र काम केले आहे. वय वाढली तरी मैत्री घट्ट झाली आहे. राजन तेली, प्रमोद जठार, गोट्या सावंत याचे आपल्याला कसे सहकार्य लाभले होते यांच्याही आठवणी सुरेश प्रभू यांनी सांगितल्या.
घरी परत आल्याचा आजचा हा कार्यक्रम असल्याची आपली भावना आहे असे श्री .प्रभू म्हणाले.
कणकवली म्हणजे सर्व राजकीय सूत्रे हलविणारे सत्ताकेंद्र आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे नेतूत्व राज्याला मालवण-कणकवली मुळेच लाभले.कणकवलीत राजकारण,समाजकारण, घडते आणि जिल्ह्याला दिशा दिली जाते, असे हे कणकवली असल्याचे सुरेश प्रभू म्हणालेत.

प्रधानमंत्री हे देशाने स्वीकारले नेतूत्व आहे. याचे उदाहरण देताना ग्लोबल वार्मिंग च्या निर्णयावेळी ओबामा, नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत कसा निर्णय घेतला याची माहिती दिली. तर शेतकऱ्यांनच्या बँक खात्यात दिल्लीहून जमा पैसे जमा होतात, मच्छिमारांना योजना येतात. ही मोदींची दूरदृष्टी आहे. मी खासदार असतांना गैस कनेक्शन साठी लोक खासदारांच्या पत्रासाठी यायचेत मात्र मोदींनी हे बंद करून मोफत गैस योजना सुरू केली.

पडीकजमीन आणि पाणलोट योजना सुरू केली. आता मोदींनी प्रत्येक नळाला पाणी ही योजना आणली. सक्षमता असलेला नेताच अशा महत्वाकांक्षी योजना आणू शकतो. तसेच प्रत्येक कुटूंबाचे बँक खाते सुरू केले. जागरूक प्रधानमंत्री देशाला लाभले आहेत. नरेंद्र मोदी कधी झोपतात हे कळत नाही. कधी समर्पक केलात तरी ते भेटतात बोलतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महामार्गाचे प्रश्न सांगितले आहेत.

असे सांगताना सुरेश प्रभू म्हणलाले, विमानतळाचा उपयोग पर्यटनासाठी होतो , लोकांना येण्यासाठी उतरण्यासाठी होतो मात्र राजकारणासाठी होतो हे प्रथमच पाहायला मिळाले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन आलो होतो मात्र त्यातील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. हा विमानतळ राजकारणासाठी नसून सर्व सामन्यासाठी आहे.हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी प्रमोद जठार यांनी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे आणि सुरेश प्रभू यांनी एक वर्किंग कमिटी करून नेतूत्व करावे आणि प्रधानमंत्री मोदी यांच्याशी बैठक करून कोकणाला विकासाला नवा आयाम द्या अशी मागणी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 10 =