You are currently viewing वेंगुर्ला येथे २० जुलै रोजी रक्तदान शिबिर

वेंगुर्ला येथे २० जुलै रोजी रक्तदान शिबिर

*वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले (एन.सी.सी. व एन.एस.एस. विभाग), सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांचे आयोजन*

 

*वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे सलग २६ वे रक्तदान शिबिर*

 

वेंगुर्ले : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले (एन.सी.सी. व एन.एस.एस.विभाग), सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताची मागणी वाढली असून अत्यावश्यक रक्तसाठा उपलब्ध नसल्याने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरास उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे तसेच नावनोंदणी व अधिक माहितीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ले चे अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा