You are currently viewing सावंतवाडी माठेवाडा येथे सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त युवतींची रॅली..

सावंतवाडी माठेवाडा येथे सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त युवतींची रॅली..

सावंतवाडी
स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत जि. प. प्राथमिक शाळा अंगणवाडी क्रमांक ६६ च्या चार वर्षाच्या मुलांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा करून सोशल डिस्टंसिंगने रॅली काढली आणि स्त्री शिक्षणाबद्दल जनजागृती केली.

या रॅलीमध्ये स्त्री शिक्षणाबद्दल चे महत्त्व पटवून देणारे फलक घेऊन युवतींनी जनजागृती केली. “मुलगी झाली प्रगती झाली” “मुली शिक्षण घेतील आणि समृद्ध होतील” “मुलगी वाचवा मुलगी शिकवा” “मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली तर खेद नको” “मुलगा पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी” “मुलीचे शिक्षण म्हणजेच प्रगतीचे लक्षण” असे फलक घेऊन ही रँली प्राथमिक शाळेपासून माठेवाडा परिसरामध्ये काढण्यात आली.

या रॅलीमध्ये कु. गरिमा सावंत व कु. तनिष्क मेस्त्री या चार वर्षांच्या दोन मुलांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशामध्ये सहभाग घेतला होता.

या रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर तसेेेच प्रांजल मेस्त्री, रीमा पटेल, प्रगती पटेल, सानिका सासोलकर, श्‍वेता आकेरकर, नमिता सावंत आदी महिला पालक आणि किशोरीका सहभागी झाल्या होत्या.

सोशल डिस्टंसिंग पालन करुन झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सावित्रीबाईंच्या वेशातील गरिमा सावंत हिने सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले या मुलींच्या शिक्षणासाठी चंदन झिजावेे त्याप्रमाणे झिजल्या; त्या नऊ वर्षांच्या असताना शेतात काम करायच्या तेव्हा मातीत त्या अक्षरे गिरवत असत. आपले पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत सर्वत्र पेटवून महिलांना शिक्षित केले. सावित्रीबाईंचा आदर्श तुम्ही आम्ही सर्व महिलांनी घ्यावा आणि त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =