You are currently viewing कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना…

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना…

सर्वात तरुण महापौर नंतर आता तरुण सरपंच होण्याचा तरुणीचा नवा विक्रम!!

तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितले जाते. मात्र हीच तरुणाई अनेकदा देशातील राजकीय विषयांवर उदासीन असल्याने राजकारणातील तरुणांचा सहभाग कमी असलेला दिसून येतो. मात्र देशात राजकीय बदलांना हीच तरुणाई महत्वाची भुमिका बजावतात.

तर देशातील महिला देखील आता सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. आज देशातील पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असून या पार्श्वभूमीवर एका तरुण महिला सरपंच होणे अभिमानाची गोष्ट आहे.

यावेळी केरळच्या तिरुअनंतपुरमची रहिवासी असलेल्या २१ वर्षांच्या आर्या राजेंद्रन हीने देशात सर्वात तरुण महापौर होण्याचा एक नवा इतिहास रचला आहे. तर त्यांनतर आता केरळ याच राज्यामध्ये पुन्हा एकदा देशातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा आणखी एक विक्रम २१ वर्षाच्या तरुणीने केला आहे.

राज्याच्या पाथानमथिट्टा जिल्ह्यातील अरुवाप्पुलम या गावातील गावकर्यांनी २१ वर्षाच्या तरुणीला नागरिकांनी सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रेश्मा मरियम रॉय असे या तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तिने हे यश प्राप्त केले आहे. रेश्माचे वडील हे एक लाकूड व्यापारी असून, आई एका महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. तिला एक भाऊदेखील आहे.

रेश्माने व्हीएनएस महाविद्यालयातून बीबीए पदवी घेतली आहे. ती डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)ची जिल्हा समिती सदस्य आहे. तसेच, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची (एसएफआय) जिल्हा सचिवालय सदस्य आहे. यासोबतच ती सीपीआयएम पक्षाची शाखा समिती सदस्यही आहे.

विशेष म्हणजे या तरुणीने आपल्या २१ व्या वाढदिवसाच्या दुसर्याच दिवशी स्थानिक निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. अरुवाप्पुलमच्या ११व्या वॉर्डमधून तिने डाव्या पक्षांकडून आपला अर्ज भरला होता. त्यानंतर गावकर्यांनी या तरुणीला विजयी करून दिल आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या वॉर्डमध्ये, ७० मतांच्या मताधिक्याने ती निवडून आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =