You are currently viewing फणसवाडी शाळेच्या माजी विद्यार्थी सतीश सावंत यांचा अनोखा उपक्रम…

फणसवाडी शाळेच्या माजी विद्यार्थी सतीश सावंत यांचा अनोखा उपक्रम…

वरवडे फणसवाडी शाळेस कोरोना प्रतिबंधात्मक स्टीमर व अन्य साहित्यांचे केले वाटप

कणकवली :

जिल्हा परिषद वरवडे फणसनगर शाळेचे माजी विद्यार्थी सतीश रघुनाथ सावंत यांनी आपली शैक्षणीक बांधिलकी जपत वरवडे फणसवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक स्टीमर आणि अन्य साहित्याचे मोफत वाटप केले. कोरोना काळात दररोज गरम पाण्याची वाफ घेणे आवश्यक असल्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. सध्या थंडीचा मोसम सुरू असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सर्दी पडसे होण्याचा संभव जास्त असतो. कोरोनामुळे शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाइन अथवा ऑफलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरू आहे. फणसवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली सावंत यांच्याकडे हे साहित्य सतीश सावंत यांनी शैक्षणिक देणगी स्वरूपात सुपूर्त केले. केंद्रप्रमुख सौ कविटकर, मुख्याध्यापिका सौ. वृषाली सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सतीश मेस्त्री, शिवदास सादये यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपशिक्षक संतोष कांबळी, शिक्षिका अमृता पाटील , अंगणवाडी सेविका मंगल राणे-सावंत, आणि पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =