You are currently viewing शिर्षक:- पंढरीची वारी

शिर्षक:- पंढरीची वारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*शिर्षक:- पंढरीची वारी.*

 

सुंदर ते ध्यान | माझ्या विठ्ठलाचे

मनामध्ये त्याचे | दिसे रूप ||१||

 

विटेवरी उभा | युगे अठ्ठावीस

जीव कासावीस | त्याच्या साठी ||२||

 

सर्व चराचर | निर्मितो ईश्वर

देह हा नश्वर | तोच देतो ||३||

 

अवघी दुनिया | भक्त आहे सारी

पंढरीची वारी | वारकरी ||४||

 

पाठीशी आपल्या | उभा संकटात

रक्षक विश्वात | सर्वांचा तो ||५||

 

अडकला श्वास | लागे त्याची आस

माझिया मनास | दर्शन दे ||६||

 

हीच एक आहे | मनिषा उरात

पंढरपूरात | भेट व्हावी ||७||

 

 

✍🏻 *कवयित्री अख़्तर पठाण*

*(नासिक रोड)*

*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा