You are currently viewing गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध..

गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध..

कणकवली :

कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे. तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तोंडवली- बावशी ग्रामपंचायतमध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत.तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत. कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत . 

त्यातील गांधीनगर ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात प्रभाग १ मध्ये प्रसन्ना प्रशांत सावंत, तुषार भगवान सावंत, राजेंद्र रामचंद्र सावंत, प्रभाग २ मधून मंजुषा महादेव बोभाटे, विनिता दिनेश सावंत आणि प्रभाग ३ मधून मंगेश अनंत बोभाटे, सुनीता अनाजी सावंत या सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यांच्या विरोधात कोणाचेही अर्ज नसल्याने ही ग्रामपंचाय पूर्णतः बिनविरोध झाली आहे. याठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून ज्ञानेश पाताडे, सहाय्यक तनोज कळसुलकर यांनी काम पाहत आहेत. तोंडवली -बावशी ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =