150 खेळाडूंना संधी; नोंदणीची अंतिम तारीख 28 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत
कणकवली :
चेतना ट्रेडर्स, मालवण कट्टा आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा 2026 येत्या 30 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे. ही स्पर्धा लक्ष्मी विष्णु हॉल, कॉलेज रोड, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत मुख्य बक्षिसे म्हणून विजेत्यास ₹3000, उपविजेत्यास ₹2000, तर तृतीय क्रमांकासाठी ₹1000 रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय चौथा व पाचवा क्रमांक ₹750, तसेच सहावा ते दहावा क्रमांक ₹500 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तसेच उत्तेजनार्थ गटात बेस्ट अनरेटेड व बेस्ट व्हेटरन (50+) या विभागात अनुक्रमे ₹1000, ₹700, ₹400 अशी बक्षिसे असतील. लहान मुलांसाठी U9, U11, U13 व U15 गटांमध्येही स्वतंत्र स्पर्धा होणार असून विजेत्यांना विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹300 ठेवण्यात आली असून नोंदणीची अंतिम तारीख 28 एप्रिल 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. स्पर्धेत एकूण 150 खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे.
स्पर्धा सकाळी 10.00 वाजता सुरू होईल आणि फिडे नियमांनुसार सामने खेळवले जातील (वेळ : 10 + 5). स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंना नाश्ता देण्यात येणार असून इच्छुकांसाठी दुपारच्या जेवणाची कूपन (₹100) सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.
नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9422381949 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. आयोजकांकडून वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
