You are currently viewing सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा विजांचा लखलखाट आणि कडकडाटासह पावसाचा शिडकावा

सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा विजांचा लखलखाट आणि कडकडाटासह पावसाचा शिडकावा

*सोसाट्याच्या वाऱ्याने सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या शेजारी भलेमोठे झाड पडले रस्त्यावर…. वाहतूक वळविली बाजारपेठ मार्गाने*

 

सावंतवाडी शहरात आज पहाटे देखील पावसाचा शिडकावा झाला होता. आज मंगळवार आठवडा बाजार असल्याने बाजारावर पावसाचे सावट होते. परंतु दिवसभर ढगाळ असणाऱ्या वातावरणाने संध्याकाळी थंडावा निर्माण केला आणि रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा सुरू झाला, वाऱ्यासोबत पावसाचा शिडकावा झाला. रात्री सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे सावंतवाडीच्या दिवाणी न्यायालय शेजारील भला मोठा वृक्ष अर्ध्यावरून तुटून जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोसळला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावून वाहतूक बाजारपेठ मार्गे वळविण्यात आली.

दिवाणी न्यायालय शेजारील रस्त्यावर पडलेले झाड कापून हटविण्याची कारवाई सुरू आहे. भलेमोठे झाड विद्युत तारांवर पडल्यामुळे चिटणीस नाक्यावरील विद्युत तारा जमिनीवर आल्या. सावंतवाडी शहरात अवकाळी पावसात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकाणी विजेच्या तारा पडल्यामुळे सावंतवाडी शहर रात्री नऊ वाजल्यापासून अंधारातच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा