You are currently viewing कणकवलीत ​५० पैकी तोंडवली बावशी मधील ​१ नामनिर्देशनपत्र अवैध

कणकवलीत ​५० पैकी तोंडवली बावशी मधील ​१ नामनिर्देशनपत्र अवैध

कणकवली तालुक्यातील​ ३ ग्रामपंचायतींसाठी ​४९ उमेदवार रिंगणात, दोन ग्रामपंचायतींमधील लढतीचे चित्र​ ४ जानेवारी रोजी स्पष्ट होणार

कणकवली

कणकवली तालुक्यातील ​३ ग्रामपंचायत साठी एकूण दाखल झालेल्या ​५० नामनिर्देशन पत्रांमधील तोंडवली – बावशी येथील नामाप्र प्रवर्गातील ​१ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. उर्वरित ​४९ नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील यांनी दिली. कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रामपंचायत मध्ये ​७ जागांसाठी ​३० अर्ज तर गांधीनगर मध्ये एकूण ​७ जागांसाठी प्रत्येकी ​१ याप्रमाणे ​७ अर्ज व भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये ​७ जागांसाठी ​१३ अर्ज दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी त्या-त्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समोर गुरुवारी सकाळपासून कणकवली तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आली. यात तोंडवली बावशी प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकाच उमेद्वाराने नामाप्र जागेसाठी​ २ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने नियमानुसार ​१ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. त्यामुळे ​७ जागांसाठी ​२९ उमेदवार रिगणात राहिले. मात्र​ ​​४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तोंडवली- बावशी व भिरवंडे ग्रामपंचायत मधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर गांधीनगर ग्रामपंचायत च्या प्रत्येक जागेसाठी ​१ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोधची अधिकृत घोषणा ​४ रोजी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा