You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीत 1 हजार 558 अर्ज प्राप्त…

ग्रामपंचायत निवडणुकीत 1 हजार 558 अर्ज प्राप्त…

ओरोस :

जिल्ह्यात 70 ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा अक्षरक्ष: पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत किती अर्ज भरले. हे मोजण्याचे काम सर्व तहसील कार्यालयात सुरू होते. सुमारे 1 हजार 558 अर्ज प्राप्त होऊन अर्जाचा पाऊसच पडला.आजआ उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.

बुधवारी सर्व तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज ऑनलाईन बघण्यासाठी झालेल्या गोंधळ पाहता बुधवारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले. सोबतच अर्ज भरण्यास सायंकाळी साडेपाच पर्यंत वेळ वाढवून मिळाला होता. यामुळे सायंकाळी साडेपाच पर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.

सायंकाळी सहानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धांदल उडाली होती. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीचा गावामध्ये गावांमध्ये निवडणुकीच्या निवडणूक लढवण्याच्या योजना आखल्या जात आहे. 4 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्या दिवशी होणार आहे 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

आतापर्यंत *तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज*

दोडामार्ग (26), सावंतवाडी (378), वेंगुर्ला (55), कुडाळ (216), मालवण (192), कणकवली (50), वैभववाडी (236), देवगड (405)

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − nine =