You are currently viewing ३० एप्रिल ते ४ मे रोजी मळेवाड येथे पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन

३० एप्रिल ते ४ मे रोजी मळेवाड येथे पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन

सावंतवाडी –

 

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्या वतीने ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत मळेवाड येथे मळेवाड पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे च्या सहकार्याने व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित ३० एप्रिल ते ४ मे २०२३ या कालावधीत भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या पहिला दिवशी ३० एप्रिल ३०२३ रोजी सकाळी ९ वा. श्री गणेश मूर्तीवर अभिषेक व धार्मिक कार्यक्रम सकाळी १० वा. – श्री सत्यनारायण महापूजा,रात्रौ ७.३० वा. हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग *मायासंग्राम* दुसरा दिवस १ मे २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे, युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे,संत समाज मळेवाड व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने *महारक्तदान शिबिर*, रात्रौ ७.३० वा. – केशव खांबल प्रस्तुत श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग *शापमुक्त* तिसरा दिवस २ मे २०२३ रोजी

रात्रौ ९.०० वा. सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ. रात्रौ ९.३० वा. – गाव *मर्यादित रेकॉर्ड डान्स व वेशभूषा स्पर्धा,तसेच जिल्हास्तरीय निमंत्रित रेकॉर्ड डान्स स्पर्धा*,चौथा दिवस ३ मे २०२३ रोजी रात्रौ ९.३० वा. – वैभवी क्रिएशन, डिचोली (गोवा) निर्मित आणि अमर फाळकर प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी नाट्यप्रयोग *माझ्या मित्राची बायको* तर पाचवा दिवस ४ मे २०२३ रोजी रात्रौ ९.३० वा.*सिंधु सुंदरी २०२३* सौंदर्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा युवा युवा मित्र मंडळ अध्यक्ष हेमंत मराठे तसेच ग्रामपंचायत सदस्य,युवा मित्र मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा