**जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रोप*
इवल्या रोपाला जसं
खत पाणी देऊन
कुंपणकाटी लावून
आपण वाढवतो
तसंच वाढवावं
बाळाला
करावं संगोपन
सिंचून सारी माया प्रेम
मग रोप जसं
वाढतं जातं
तसंच वाढत जातं बाळ
मागे पडत जातो काळ
रोपाचं झाड होतं
बाळही होतो मोठा
झाड डौलाने डोलू लागतं
वाऱ्यावर हालू लागतं
झाडाला येतात फुलं फळं
झाडावर येतात पक्षी
झाडाखाली वाटसरु
झाड गजबजतं
बाळही होतो मोठा
नावलौकिक वाढतो
कर्तृत्वाचा डंका मग
चहूदिशांत गाजतो
अनुपमा जाधव