You are currently viewing रमा..

रमा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांनी रमाई जयंती निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

 

💐रमा..💐

..

भीमाची रमाई

सहचारिणी तू उत्तम

स्वप्न मनोरम

पूर्णत्वास!!

 

कष्टली अपार

भविष्य घडवण्या पतीचे

बळ पंखांचे

दिलेस!!

 

आदरपूर्वक नाव

भीमरावांची तू रमा

जपले पुरूषोत्तमा

देशास्तव!!

 

झेलता कष्ट

मुखावर ठेवले हास्य

पतीचे भाष्य

प्रमाण!!

 

आधार महावृक्षाची

नाजुक वेल बनली

महामानवाला दिली

उर्जा!!🙏

 

🍃🍃🌷🍃🍃🌷🍃

 

अरूणा दुद्दलवार@✒️🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =