You are currently viewing लेक मायेचं शिंपण

लेक मायेचं शिंपण

*”काव्य निनाद साहीत्य मंच, पुणेच्या सदस्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”लेक मायेचं शिंपण*

झाला साऱ्यांसी आनंद,. लेक आली घरी….
ऋण फेडू कसे तीचे,. होउन उतराई झाले आई….१

किती गुणी लेक माझी,लाडकी साऱ्या जगाची,
कोड कौतूक करते तीचे,करते तीचीच काळजी……

कोडकौतूके तीच्याच मीही लहान ग होई,
साऱ्या कुटुंबास लळा लावून ती जाई,…..

ले क. झाली ग मोठी आता,सोडले हे माहेर,
कंठ दाटतो पित्याचा,. आईसही मग हुरहुर…..

भातूकली, लपाछपी, सोंगट्या खेळत होती अंगणी,
संसारी पडली बाहुली, डोळ्यांत दाटते पाणी…..

जन्म घेते आईच्या उदरी,नांदते दूसऱ्याच्या घरी,
लेकीला माहेर मीळावे, म्हणून राबते घरोघरी…….

लेक आईंचं काळीज,. बापाचं प्रेमळ हृदय,
परक्याचे धन जरी,तरी असतो भाग्योदय……

*”लेक मायेचं शिंपण*”. संस्कारांची अशी खाण,
दोन्ही कुळाचा अभीमान,. देवाजी चे अमुल्य दान…..

लेक मायेचं शिंपण,. जसं कोजागीरीचं चांदणं……..
पैंजणांनी ग तीच्या,. दणाणतं माझं अंगण,…

लेकीला माझ्या आनंदी,ठेव रे तू देवराया…….
सुखी ठेव आयूष्यभर ,मागणे हेची तुझ्या पाया……
मागणे हेची तुझ्या पाया………

योगिनी वसंत पैठणकर नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा