You are currently viewing घराला लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक व अन्य साहित्य जळून खाक

घराला लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक व अन्य साहित्य जळून खाक

घराला लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक व अन्य साहित्य जळून खाक

किर्लोस भावेवाडी येथे घटना;साडेचार लाखाचे नुकसान

कणकवली

मालवण तालुक्यातील किर्लोस भावेवाडी येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आहेत घराचे छप्पर व घरातील इलेक्ट्रिक व अन्य साहित्य जळून खाक होण्याची घटना घडली आहे. घराला लागलेल्या या आगीत भावेवाडी येथील विनोद विष्णू भावे यांचे जवळपास साडेचार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण शॉर्टसर्किट की देवापुढे लावलेला दिवा हे समजू शकले नाही.
मालवण तालुक्यातील किर्लोस-
भावेवाडी येथे विनोद विष्णू भावे यांचे घर असून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली.विनोद भावे यांचे घर वस्तीपासून काही अंतरावर आहे. यावेळी विनोद भावे व त्यांची पत्नी आणि मुलगी कामानिमित्ताने बाहेर गेली असल्याने घरात कोणी नव्हते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला आगीने पेट घेतला. या आगीत घरातील इलेक्ट्रिक साहित्य त्याचप्रमाणे अन्य वस्तू जळून खाक झाल्या. घरातील संपूर्ण विद्युत लाईन जळून गेली असून छपराचा भाग त्याचप्रमाणे खुर्च्या ,बेड, जेवणाचे साहित्य तसेच इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. घर वस्ती पासून काही अंतरावर असल्याने आग लागण्याचे ग्रामस्थांच्या उशिरा लक्षात आले त्यानंतर आग विजविण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य खाक झाले होते.
तलाठी मनोहर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . त्याचप्रमाणे किर्लोस गावच्या सरपंच साक्षी चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, मानसी भावे, सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड , किर्लोस तंटामुक्त समिती अध्यक्ष शशिकांत भावे, माजी सरपंच प्रदीप सावंत, पोलीस पाटील किशोर लाड,माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, माजी उपसरपंच अरुण भावे, सुनिल भावे, श्री रामेश्वर सोसायटी चेअरमन स्वानंद भावे , अनंत कदम व इतरानी घटनास्थळी भेट दिली.

या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही शकले नसले तरी सदरची आग देवापुढे लावलेला दिवा पडल्याने की शॉर्टसर्किटने याबाबतचा खुलासा होऊ शकलेला नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा