You are currently viewing प्रा. रुपेश पाटील यांना ‘आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार’ प्रदान

प्रा. रुपेश पाटील यांना ‘आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार’ प्रदान

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र यांचे सहकार्य..

सावंतवाडी

येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार विजेते प्रा. रुपेश युवराज पाटील यांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र यांचे सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन या संस्थेचा
‘आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला.

सदर राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेचे संस्थापक कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले होते. यंदाच्या ‘सर्वसाधारण व्यक्ती आदर्श अष्टपैलू व्यक्ती’ पुरस्कारासाठी
प्रा. रुपेश पाटील (मूळ गाव धुळे, ह. मु. सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली होती.
रविवारी हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव वेस्ट यांचे अध्यक्ष संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोले, संस्थेच्या सर्वेसर्वा शारदाताई पाटील, बाळासाहेब पाटील, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, कार्याध्यक्ष निलेश पारकर यांच्या उपस्थितीत प्रा. रुपेश पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास राष्ट्रीय अपंग विकास महसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील, भक्ती सामंत, उमेश कदम, अल्लाहबक्ष शेख, सबिना शेख, सुधाकर घोगळे, हरी परब, बाबा पास्ते, संतोष सामंत, शिरीष पाटील, दत्ता पन्हाळकर, विजय चौगुले, नितीन कांबळे, उमेश,इंगळे, गायत्री कदम, मयुरी माळकर यांसह शारदादेवी पाटील, सदानंद पाटील, लता पाटील, सरीता कोंडुस्कर, डॉ. सी. ए, कोंडुस्कर , अक्षदा पाटील, देवदत्त पाटील, पूजा धुरी, सुचिता कारुडेकर, संदीप पाटील, दिलीप मलांडकर, एकनाथ हरमलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. रुपेश पाटील यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा