You are currently viewing कणकवली शहर आणि परिसरातील गावांवरून विमानाच्या फेऱ्या

कणकवली शहर आणि परिसरातील गावांवरून विमानाच्या फेऱ्या

कणकवली शहर आणि परिसरातील गावांवरून विमानाच्या फेऱ्या

विमानाने मारल्या पाच ते सहा फेऱ्या ; चर्चांना उधाण

कणकवली :

कणकवली शहर आणि परिसरातील गावांवरून फेऱ्या मारणारे चार्टड विमान कोणाचे ? आणि हे विमान का फेऱ्या मारत आहे या बाबतची चर्चा कणकवलीत सर्वत्र सुरू आहे. हे विमान कोणत्या गोष्टीसाठी फेऱ्या मारत होते ? कोणत्या प्रकारचा सर्वे करत होते काय ? पाच ते सहा फेऱ्या या विमानाने मारल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे.

कणकवली शहरासह लगतच्या कलमठ,वागदे, जानवली, हळवल या गावांच्या परिसरात छोट्या विमानाची गस्त सुरू होती. पाच ते दहा मिनिटांच्या फरकाने हे विमान घिरट्या घालत असल्याने शहर तसेच तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती. वेंगुर्लेतील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे विमान आले असल्याचीही चर्चा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने ही शक्यता फेटाळून लावली. दरम्यान सातत्याने हे छोटे विमान शहर आणि लगतच्या गावांवरून फिरत असल्याने नागरिकांनीही विमानाची छबी मोबाईल मध्ये टिपली. याबाबत प्रशासनाच्या अनेक विभागांशी संपर्क साधला असता या विमानाच्या फेऱ्यांबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा