You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार क्रिकेट स्टेडियम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार क्रिकेट स्टेडियम

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार क्रिकेट स्टेडियम*

*युवा नेते विशाल परब*

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी,मळगाव येथे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमवर दर्जेदार सामने पाहता येतील, शंभर एकर जागेत अंबानी यांच्या मुंबईतील स्टेडीएमशी साजेसे असलेले स्टेडियम उभारण्यात येईल, असा विश्वास भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.

सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर कोकण नाऊ प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संवाद मीडियाचे संपादक राजेश नाईक, कोकण नाऊचे संपादक विकास गावकर, व्हेरीनाईम संस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मण नाईक, केतन आजगावकर, संदीप नाटलेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा