You are currently viewing मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर नक्कीच आपला निर्णय मागे घेतील

मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर नक्कीच आपला निर्णय मागे घेतील

मालवण शिवसेना कार्यकारणीत लवकरच बदल करण्यात येतील – खास. विनायक राऊत

 

मालवण :

मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा मत परिवर्तनासाठी आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर खासदार विनायक राऊत यांनी महेश कांदळगावकर यांची आम्हाला गरज असून आगामी मालवण नगरपालिकेची निवडणूक श्री. कांदळगावकर आणि इतर मालवणातील प्रमुख सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल असे खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

दरम्यान, खासदार राऊत यांनी मालवण शिवसेना कार्यकारणीत लवकरच बदल करण्यात येतील असे संकेत देतानाच राऊत यांनी कोण जर कोणाला तरी चालवून अशा पद्धतीने शिवसेना पक्ष संघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मुळीच सहन केले जाणार नाही असा इशारा ही खासदार राऊत यांनी दिल्याने श्री कांदळगावकर यांचा राजीनामा हा पक्ष संघटनेतील मतभेदांमुळे दिल्याचे एक प्रकारे उघड झाले आहे.

चार दिवसापूर्वी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपण शिवसेना पक्षाचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी आज शनिवारी दुपारी महेश कांदळगावकर यांची पदाधिकाऱ्यां समवेत भेट घेतली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, किरण वाळके, महेश जावकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, भाई कासवकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, पूजा तळाशीलकर, स्मृती कांदळगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, मागील ५ वर्षात मालवण शहराला नवीन आकार आणि नवीन रूप देण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. महेश आणि त्याचे कुटुंबीय राजकारणात अद्याप रमलेले नाही. पण समाजकारणात क्रमांक एकने ते उत्तीर्ण झाले आहेत . महेश कांदळगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांची शिवसेनेला खूप गरज आहे. म्हणूनच मी आणि वैभव नाईक कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या भेटीला आलो आहे. मी, वैभव नाईक आणि संपूर्ण शिवसेना महेश कांदळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.

मालवण शहर शिवसेनेत लवकरच फेरबदल करण्यात येणार आहेत. लवकरच एक बैठक घेऊन काही मतभेद असतील तर त्याच्यावर नक्की विचार करू. परंतु, कोणी पक्ष संघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. महेश कांदळगावकर यांच्यासारखी चांगली माणसे ही शिवसेनेची गरज आहे. आणि ती सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. नवीन आलेल्यांचा कार्यकारिणीत समावेश केला जाणार आहे. येत्या १५ दिवसात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नवीन कार्यकारणी निवड केली जाईल, असे खा. विनायक राऊत म्हणाले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eighteen =