You are currently viewing पहाटवेळ

पहाटवेळ

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

पहाटवेळ

 

रोज पहाटे मी

फिरायला निघते

नव्या नव्या दिवसाला

कौतुकाने बघते

 

 

हळू हळू आकाश

उजळून येत असतं

कणाकणाला मना मनाला

उभारी देत असतं

 

 

कळ्यांची उमलून

फुले होत असतात

वाऱ्यावर झुलतांना

गोड गोड हसतात

 

 

फुलांच्या सुगंधाने

आसमंत भरतो

सुगंधित वाराही

सर्वदूर फिरतो

 

 

घरट्यांमधून जागतात

पाखरे गोजिरवाणी

आनंदाने घुमवतात

आपली किलबिल गाणी

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा