You are currently viewing अंगारकी संकष्टी चतुर्थीनिम्मित सावंतवाडीत वैश्यवाडा हनुमान मंदिरात ५ हजार ५५६ मोदकाचा नैवेद्य अर्पण

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिम्मित सावंतवाडीत वैश्यवाडा हनुमान मंदिरात ५ हजार ५५६ मोदकाचा नैवेद्य अर्पण

सावंतवाडीतील वैश्यवाडा हनुमान मंदिर येथे श्री हनुमान मंदिर उत्सव समिती वैश्यवाडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावंतवाडी तर्फे २१ दिवसांच्या सार्वजनिक बाप्पा चरणी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्रमोदकाचा नैवेद्य अर्पण सोहळा पार पडला.

या सोहळ्याचे आयोजन अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त करण्यात आले होते. तब्बल ५ हजार ५५६ मोदकांचा नैवेद्य श्री गणेशाला यावेळी अर्पण करण्यात आला. तसेच उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, खवा मोदक आदी विविध प्रकारचे हजारो मोदक बाप्पाला अर्पण करण्यात आले.

दरवर्षी हा सोहळा या ठिकाणी पार पडतो. यावेळी मोदकांचा नैवेद्य अर्पण करत नवस देखील पूर्ण केला जातो. पुजा, महाआरतीनंतर गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात या सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी वैश्यवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा