You are currently viewing जानवली येथील अपघात प्रकरणातील कार आणि चालक पोलिसांच्या ताब्यात…

जानवली येथील अपघात प्रकरणातील कार आणि चालक पोलिसांच्या ताब्यात…

जानवली येथील अपघात प्रकरणातील कार आणि चालक पोलिसांच्या ताब्यात…

पुणे-निगडी येथून कारसहित चालकाला घेतले ताब्यात

कणकवली

जानवली येथील मुंबई-गोवा महामार्गावरून चालणारा पादचारी अनिल कदम यांना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालकाने धूम ठोकली होती. अखेर कणकवली पोलिसांनी पुणे-निगडी येथून कारसहित चालकाला ताब्यात घेतले.
जाधव यांना धडक देऊन पसार झालेली कार ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक समरेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व अन्य पोलिसांच्या पथकामार्फत शोध मोहीम सुरु होती. शोध मोहिमेदरम्यान पुणे-निगडी येथे सदर कार सापडली व चालकालाही त्याच भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
कदम यांच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थांनी शुक्रवारी दीड तासांहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन केले होते. अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आंदोलनाशी चर्चा करून कदम कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. फरार कार चालकाचा शोध घेण्यासाठी कणकवली पोलिसांचे पथक काम करीत होते. पोलिसांना सदर कार पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे निगडी येथून सदर कारसहित चालकास ताब्यात घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा