You are currently viewing मळगाव येथे 3 जुलैला बुद्धिबळ शिबिर

मळगाव येथे 3 जुलैला बुद्धिबळ शिबिर

सावंतवाडी :

 

मळगाव येथिल कै. उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथिल मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.

हे शिबीर रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1.30 यावेळात आयोजिले असून या शिबिरात पहिली पासून महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींना भाग घेता येईल. या शिबिरात मुक्ताई अकॅडमीचे श्री.कौस्तुभ पेडणेकर व त्यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबीरसाठी फक्त 40 प्रशिक्षणार्थी भाग घेऊ शकतात. आपली नावनोंदणी वाचनालयात(रजेचा वार वगळता) सकाळी 9 ते 12 दुपारी 4 ते 7 यावेळेत नोंदवावीत. तसेच मोबाईलवर श्री.हेमंत खानोलकर 9881713938,श्री.गुरुनाथ नार्वेकर,8855079346,श्री.बी.एस्.मुळीक 9422390604 या नंबरवर तारीख 30 जून 2022 रोजी पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन वाचनालय संचालक मंडळ व मुक्ताई अकॅडमी तर्फे करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =