You are currently viewing महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करावी – डॉ. अनिशा दळवी

महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करावी – डॉ. अनिशा दळवी

दोडामार्ग

सध्याच्या घडीला आजची महिला असुरक्षित आहे.दिवसाघडीला अत्याचाराचा आकडा हा वाढतच चालला आहे त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करावी यासाठी आज दोडामार्ग तहसीलदार यांना माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील महिला आज असुरक्षित आहे अशी चिन्हे दिसू लागली आहे प्रत्येक दिवशी अत्याचाराचा आकडा हा वेगवेगळ्या स्थितीत ऐकू येतो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी महिला असुरक्षित आहे अशी भीती निर्माण झाली आहे या विकृत गोष्टी थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक उपाय योजना गरजेचे आहे. अत्याचाराविरोधात आवाज उठवूनही सरकार ठोस निर्णय का घेत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला तात्काळ सरकारने यावर उपाय योजना करावी अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस भाजप महिला तालुकाध्यक्ष कल्पना बुडकुले प्रियंका सोनवलकर दीपा राऊळ शर्मिला राणे दिपाली नाईक दर्शना कवठणकर शर्मिला परमेकर आदी महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =