You are currently viewing आय ए एस ची तयारी कशी करावी?

आय ए एस ची तयारी कशी करावी?

रविवारी दिल्लीच्या प्रशिक्षकांची विनामूल्य कार्यशाळा

अमरावती

नुकतीच 2022- 2023 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रशासनात जावयाचे आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीने व मिशन आयएएस फाउंडेशनने दिल्लीच्या मालुका आयएएस अकादमीचे प्रशिक्षक श्री प्रशांत भाग्यवंत यांना निमंत्रित केले आहे .ते अमरावती विभागातील व महाराष्ट्रातील ज्या मुलांना आयएएस करावयाचे आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या विनामूल्य कार्यशाळेचा लाभ ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांनी झूम सभेच्या लिंकसाठी मिशनचे संचालक प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रक मिशन आयएएस द्वारा प्रसिद्धीला देण्यात आले आहे. या झूम मीटिंगमध्ये श्री प्रशांत भाग्यवंत हे दहावीपासून व बारावीपासून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ते विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देणार आहेत .या आभासी सभेचा कोड 85943570872 हा असून पासवर्ड 337908 हा आहे .डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी ही स्पर्धा परीक्षेच्या जगतात विनामूल्य सेवा देणारी संस्था असून या संस्थेमध्ये भारतातील 350 सनदी व राजपत्रित अधिकारी व 26 हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत .विशेष म्हणजे या संस्थेमध्ये प्रतिदिन फक्त एक रुपया एवढ्या नाममात्र शुल्कामध्ये दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके व सराव परीक्षा हे उपक्रम देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. हे सर्व उपक्रम मराठी इंग्रजी व सेमी या तीन भाषांमधून उपलब्ध करून देण्यात येतात .महाराष्ट्राच्या महामहिम राज्यपालांपासून तर शालेय शिक्षण मंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले असून मा. शिक्षण संचालकांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर राबवावा यासाठी रितसर लेखी आदेश काढलेले आहेत .या आभासी सभेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी आयएएस अधिकारी होणारच, शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर .सक्सेस स्टोरीज ऑफ आयएएस ऑफिसर .सक्सेस स्टोरीज ऑफ आयपीएस ऑफिसर. स्पर्धा परीक्षेची एबीसीडी ही 5 ई पुस्तके विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीतर्फे सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा लाभ घ्यावा अशी विनंती या कार्यशाळेच्या आयोजक व डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे अध्यक्ष प्रा. पल्लवी काठोळे व मिशन आयएएस फाउंडेशनचे सचिव प्रा. प्रवीण खांडवे यांनी केली आहे. प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे .संचालक. डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी. अमरावती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + four =