You are currently viewing राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे त्याचे देशभरातील कोट्यवधी चाहते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

पण रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. स्वत: रजनीकांत यांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार  नसल्याचं रजनीकांत यांनी जाहीर केलं आहे. प्रसारमाध्यमाकडून तशी माहिती देण्यात आली आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांना रविवारी म्हणजेच 27 डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब उच्च होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘अन्नाथे’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेल्या 12 दिवसांपासून रजनीकांत हैदराबादमध्ये आहेत. 25 डिसेंबर रोजी अचानक त्याची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, रजनीकांत यांची तब्येत बरी आहे, म्हणूनच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. ते म्हणाले की, सध्या रजनीकांत यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eleven =