You are currently viewing कणकवली पोलीस ठाण्यावर शिवसेनेचा मोर्चा….

कणकवली पोलीस ठाण्यावर शिवसेनेचा मोर्चा….

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी: वैभव नाईक, संदेश पारकर यांचे पोलिसांना निवेदन

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली असून आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. कणकवलीत तणावाची वातावरण असून पोलिस बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला आहे.
नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस काल रात्रीपासून जंगजंग पछाडत आहेत दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत. या घटनेची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सध्या जिल्हा मुख्यालयात बसून तेथे बैठक सुरू असल्याचे समजते. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या वर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता त्यानंतरपोलिसांनी घटनेच्या चार तासानंतर संशयित चार आरोपींना अटकही केली होती सध्या या गुन्ह्यांमध्ये सहा संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे मात्र या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यावर थेट आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता त्यामुळे या दोघांची चौकशी झाली होती त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथून सचिन सातपुते या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला कमालीचे वळण लागले आहे आमदार नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता असल्याने त्यांचाही सध्या ठावठिकाणा लागत नाही भाजपच्या माध्यमातून याबाबत कोणीही बोलत नाहीत. सकाळपासून शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवलीत दाखल होत होते त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत पोलीस स्टेशन गाठले पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदनही दिले आहे नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा