You are currently viewing बारावीच्या परीक्षेत टोपीवालाची स्नेहलता तेली सिंधुदुर्गात तृतीय…

बारावीच्या परीक्षेत टोपीवालाची स्नेहलता तेली सिंधुदुर्गात तृतीय…

बारावीच्या परीक्षेत टोपीवालाची स्नेहलता तेली सिंधुदुर्गात तृतीय…

तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के; समृद्धी शेट्ये द्वितीय तर मानसी करलकर तृतीय…

मालवण

फेब्रुवारी २४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. परीक्षेसाठी तालुक्यातून ८७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात टोपीवाला हायस्कूलच्या वाणिज्य शाखेची स्नेहलता सत्यविजय तेली (५६९) गुण मिळवून प्रथम आली आहे. याच शाखेची समृध्दी परशुराम शेटये (५६८) गुण मिळवून द्वितीय तर कला शाखेची मानसी निलेश करलकर (५५५) गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, बराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कट्टा, इ. द. वर्दम कला वाणिज्य कला कनिष्ठ महाविद्यालय, बराड आर्टस कॉमर्स ज्युनियर कॉलेज वराड, जयश्री वामन प्रभु आर्ट अॅन्ड कॉलेज, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

महाविद्यालयनिहाय निकाल असा- टोपीवाला ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२६ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून २७३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा प्रथम- मानसी निलेश करलकर (५५५), द्वितीय- स्वप्नील शिवाजी कांदळगावकर (५०९), तृतीय- अनुष्का अमोल परब (४९१), वाणिज्य शाखा- प्रथम- स्नेहलता सत्यविजय तेली (५६९), द्वितीय – समृध्दी परशुराम शेटये (५६८), तृतीय- कामाक्षी दिलीप काळसेकर (५५१), विज्ञान शाखा- प्रथम- निनाद प्रसाद आरोंदेकर (४९३), द्वितीय- रुद्र संदिप शिरोडकर (४८१), तृतीय- मैथीली लक्ष्मीकांत हडकर (४७३) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद परुळेकर, सचिव विजय कामत, कार्याध्यक्ष दत्तप्रसाद खानोलकर, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी अभिनंदन केले. भंडारी ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२४ टक्के लागला आहे. परीक्षेसाठी १३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. त्यापैकी १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा- प्रथम- भाग्यश्री निलेश लाड (३९५), द्वितीय- साक्षी ज्ञानेश्वर सादये (३८४), तृतीय- साक्षी नयनकुमार कुडाळकर (३६८), वाणिज्य- प्रथम- श्रावणी विनोद साळकर (५३५), द्वितीय- ईशा सत्यवान चव्हाण (५१२), तृतीय- प्रीती पंडित सावंत (५०७), विज्ञान- प्रथम- कामिनी विजय डगला (३७७), द्वितीय- दिप्ती प्रशांत कुबल (३७६), जयश्री नारायण परब (३७५) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर व संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात परीक्षेस एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेमधून २६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम- क्षितिजा बयाजी खरवते (८३.५० टक्के), द्वितीय- वैदेही मंगेश ठाकूर (७२.१७ टक्के) व आदेश अविनाश हाक्के (७२.१७ टक्के) आणि तृतीय- संदीप सुहास गावकर (६९.३३ टक्के) यांनी पटकावला आहे तर वाणिज्य शाखेमधून ३५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम- यज्ञा शरद पडवळ (७५.३३ टक्के), द्वितीय- पूजा व्यंकटेश टक्के (७३.३३ टक्के) तर तृतीय- रिया रविंद्र केळुसकर (६८.५० टक्के) यांनी पटकावला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कृ.सि.देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. हसन खान, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. मिनल सामंत आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमध्ये एकुण ५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्रथम- प्रतीक पुरुषोत्तम कासले (४४२), द्वितीय- दिपाशा अर्जुन पवार (३१६), तृतीय- शुभम लक्ष्मण शिंदे (२६२) वाणिज्य शाखेमध्ये २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्

प्रतिक्रिया व्यक्त करा