You are currently viewing प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करा : राजन तेली

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करा : राजन तेली

कणकवली

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी केली. कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अपशब्द व पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आता कारवाईची मागणी करत आहे. मात्र सुरुवात कोणी केली हे त्यांनी तपासण्याची गरज आहे. भाजपाच्या नेत्यांवर टीका करायची मुद्दामहून आरोप करायचे आणि मग प्रसिद्धीच्या झोतात राहायचं अशी संजय राऊत यांची सवय असल्याचा टोला देखील श्री तेली यांनी लगावला. या राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा जे काही जण प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी देखील तेली यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =