You are currently viewing UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन …..

UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन …..

UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन …..

लोकसभा निवडणूक काळात सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसवा आयोगच्या परीक्षेचा (UPSC Exam) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनीच्या लुटल्याचा प्रकार घडला.

तरुणीच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकून तिला लुटण्यात आले. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशन जवळील जे प्रभाग परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

अंजली पांडे, असं या पीडित तरुणीचं नाव आहे. ती युपीएससीचा अभ्यास करते. अंजली यूपीएससीच्या क्लासवरून कल्याण पुर्व येथे येत होती. त्याचवेळी जे प्रभाग परिसरात काही अज्ञातांनी तिच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचबरोबर काही वेळ तिला दिसेनासे झाले. याचाच अज्ञातांनी फायदा घेत तरुणीकडे असलेला बॅगेतील लॅपटॉप चोरी करून ते पसार झाले. दरम्यान थोड्यावेळाने या तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिली. सध्या तिला वैद्यकीय चाचणीसाठी कल्याणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान हे चोरटे कोण होते? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र रहदारीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा