You are currently viewing गंगा सप्तमी गंगापूजन निमित्त पवित्र गंगामैयाला वंदन!

गंगा सप्तमी गंगापूजन निमित्त पवित्र गंगामैयाला वंदन!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”गंगा सप्तमी गंगापूजन निमित्त पवित्र गंगामैयाला वंदन!”*

 

गंगामैयाचा महिमा आहे अपरंपार

तिन्ही लोकी होत तव सन्मान संचार।।धृ।।

 

सगर नृप प्रायोजित अश्वमेध यज्ञ

इंद्र अश्व आडवी कपिलाश्रमे बांधीत

सगर पुत्र अश्व सोडविता तप भंग होत

कपिल क्रोध नेत्र तेजाने पुत्र होत संहार।।१।।

 

भगिरथ तप करी कपिलास शरणांगत

कपिल मुनि भगिरथास देत आशीर्वाद

गंगामृते आप्तांना मुक्ती देई भगीरथ

भगिरथ तपस्येने गंगा आणली पृथ्वीवर।।२।।

 

ब्रह्मदेव विष्णुपदांचे करी पूजन

कंमंडलूतुन चरणांवर जलधार अर्पित

विष्णुपदी गंगा शिव जटेत सामावत

ऋषींनी रचिले श्रुति वेद गंगातिरावर।।३।।

 

हिमालयात गंगोत्री उगम पावे गोमुखांत

अनेक प्रांती वहात बंग सागरा मिळत

ऊर्जा दाती अखंड जल प्रवाही अमर्याद

आशीर्वाद देत करी सुफला सुजलधर।।४।।

 

जल दर्शने दुर्वांसना दैन्य दूर होत

मगंगा गंगाप उच्चारिता होत पापमुक्त

षड्रिरीपु काबू चौदा भुवने तरंगतात

गंगा ध्यान करिता सदा विजयी होणार।।५।।

 

गंगामैय्या सुमंगल करीते सदा पवित्र

पाप नाश शुद्धी घडे करीता स्नान गंगेत

पथ्यकारक औषधी जान्हवी अक्षय टिकत

भय निवारक होत त्रिविध ताप हार।।६।।

 

गंगा पृथ्वीचे भाळावरील तिलक होत

नद मृत्तिका लाविता भाळी शुभम् भवेत

गंगा धर्माचे निधान संस्कृति टिकवीत

भारताचे सौभाग्य गंगौघ संततधार।।७।।

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा