You are currently viewing शंकर अनासूने खामगांव यांना ‘जीवन संघर्ष’ पुरस्कार जाहीर

शंकर अनासूने खामगांव यांना ‘जीवन संघर्ष’ पुरस्कार जाहीर

बुलढाणा :

खामगाव जि . बुलढाणा येथिल शिक्षक शंकर अनासूने यांना संजीवनी संस्थेचा ‘ मानाचा जीवन संघर्ष ‘ हा सामाजिक कार्याचा गौरव करणारा पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला . सदर पुरस्कार केळवद ता. चिखली जि बुलढाणा येथे प्रमुख मान्यवरांच्या प्रतिभावंताच्या हस्ते मुख्य समारंभात प्रदान करण्यात येत आहे . असे संजीवनी संस्थेचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त -अध्यक्ष – डॉ. निवृत्तीभाऊ जाधव यांनी नियुक्ती पत्राका व्दारे कळविले आहे .

. मलकापूर तालुक्यातील खडकी ‘ या लहानश्या गावात जन्म घेवून प्रतिकुल खडतर परिस्थितीशी सामना करीत शिक्षण घेत अडचणीवर मात करीत शंकरराव यांनी एम ए मराठी ‘ बी . एड् . केले असून जी . वी . मेहता नवयुग विद्यालय खामगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . गेल्या २५ वर्षापासून शैक्षणिक ‘ तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असून उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताई नगर ‘ जळगाव चे बुलढाणा जिल्हा विभागीय अध्यक्ष आहेत . साहित्य काव्य यामध्ये त्यांना रुची आहे . तसेच शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संस्कृत पिढ्या घडविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत . त्यांच्या पत्नी सुविज्ञ असून शिक्षीका आहेत विद्या दानाचे पवित्र कार्य ते करीत असून भावी पिढ्यांना संस्कार मुल्य शिक्षण देत आहे . मुले मुली विद्याविभूषित आहे .

जीवन संघर्ष ‘ हा पुरस्कार ‘ माह्या आई वडीलांची थोर पुण्याई असून त्यांच्या आशिर्वादामुळेच मला ‘ हा पुरस्कार मान सन्मान मिळत आहे असे ते सांगतात .

या सोहळ्यात सर्व जातीय धर्माचे वधुवर विवाह सोहळा संपन्न होत असून त्यात महाराष्ट्रातील प्रतिभावंत साहित्यिक कवी ‘ लेखक समाज सेवक ‘ आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती चा या त समावेश आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा