You are currently viewing शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

मालवण :

मालवण तालुक्यात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना वतीने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा, रक्तदान शिबीरासह महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार असल्याची माहिती कुडाळ मालवणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी दिली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या येथील कार्यालयात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, ऋत्विक सामंत, महिला उपजिल्हाध्यक्ष नीलम शिंदे, भारती तोडणकर आदी उपस्थित होते. मामा वरेरकर नाट्यगृहात २३ रोजी दुपारी ३ वाजता पाक कला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या क्रमांकाला २१०० रुपये तर उपविजेत्या स्पर्धकाला ११०० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. तर आचरा येथे १ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २७ जानेवारी आचरा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे. “सत्कार कर्तृत्वाचा, गोडवा तिळाचा” अशी थीम घेऊन हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती बबन शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + twelve =