You are currently viewing गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर गोरगरीब जनतेसाठी विशेष बाब म्हणून साखर, डाळ व तेल रास्त दरात पुरवठा करा..

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर गोरगरीब जनतेसाठी विशेष बाब म्हणून साखर, डाळ व तेल रास्त दरात पुरवठा करा..

मनसे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

सिंधुदुर्ग :

दि. ३१ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात घरोघरी आस्थेने व निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गावोगावच्या रेशन दुकानांवर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारक गोरगरीब जनतेला विशेष बाब म्हणून प्रति कार्ड ५ किलो साखर, ५ किलो डाळ व २ लिटर तेल रास्त दरात पुरवठा करावा अशी मागणी मनसेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच साखर, तेल व डाळ या साहित्यासोबतच सद्यस्थित प्रति माह देण्यात येणारे तांदूळ व गहू धान्याचा पुरवठा २७ ऑगस्ट पूर्वी जनतेला वितरीत होईल अशी व्यवस्था करणेबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणी देखील मनसेने सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा