You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर यांनी राजीनामा दिल्याने पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त

उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर यांनी राजीनामा दिल्याने पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त

उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर यांनी राजीनामा दिल्याने पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या हृदयरोग, मेंदू आजारावरील रुग्णांची मोठी ने गैरसोय झाली आहे. अशा रुग्णांना नाईलाजस्तव खासगी हॉस्पिटल किंवा गोवा- बांबोळी रुग्णालयाचा आधार घोण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभागाने सावंतवाडी रुग्णालयातील रिक्त फिजिशियनपद तात्काळ
भरावे, अशी मागणी होत आहे.

यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सावंतवाडी तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा, सर्व आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध असल्याने सावंतवाडी तालुक्यातीलच नव्हे, तर दोडामार्ग, वेंगुर्ले, बांदा परिसरातील, गावातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात.

या रुग्णलयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत चितारी सेवेत आल्यानंतर सर्वसामान्य हृदयरोग आजारावर उपचार मिळत होते. काही वर्षे डॉ. चितारी यांनी सेवा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने एक वर्षाच्या कालावधीसाठी हृदयरोग व मेंदूतज्ज्ञ म्हणून डॉ. मुकुंद अंबापुरकर यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. मात्र, डॉ. अंबापूरकर यांनी एक वर्षाच्या आतच राजिनामा दिल्याने याठिकाणी गैरसोय होत आहे.
गोरगरीब जनतेला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. मात्र उपजिल्हा रुग्णालयात फिजिशीयन नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा