ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची कला – अनंत पिळणकर
युवा परिवर्तन प्रतिष्ठान ने राज्याच्या सांस्कृतिक केलेला प्रोत्साहन दिले
पवार ढोलपथक राजापूर ठरले अव्वल
कणकवली :
ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धा आयोजित करून युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1ने राज्याचा सांस्कृतिक वारसा जपला आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी काढले. युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1
च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व ढोल ताशा वादनची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री अनंत पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शांताराम रावराणे, च .वा रावराणे, विजय गुरव, बाळा रावराणे राजू राव राणे, काशिनाथ रावराणे , दिलीप रावराणे, विठ्ठल (बाबा) रावराणे महेश चव्हाण उत्तम तेली देवेंद्र पिळणकर आधी उपस्थित होते यावेळी युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं.1 च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री अनंत पिळणकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं.1 चे चंद्रशेखर रावराणे ,निलेश रावराणे, रमेश रावराणे ,विशाल रावराणे, प्रीतम रावराणे व सर्व मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेत पवार ढोलपथक राजापूर ने प्रथम क्रमांक पटकावला. तर नवश्या मारुती ढोलपथक वाघोटन देवगड ने द्वितीय धुतपापेश्वर ढोलपथक राजापूर ने तृतीय आणि नवलाई ढोलपथक शेडे राजापूर ने चौथा क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम 12 हजार व र फुट उंच आकर्षक चषक, द्वितीय विजेत्यांना रोख रक्कम 8 हजार व 3 फूट उंच आकर्षक चषक, तृतीय विजेत्यांना रोख 5 हजार व 2 फूट उंच आकर्षक चषक, उत्तेजनार्थ रोख रक्कम 3 हजार व 2 फूट आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना सर्व बक्षीस आणि चषक कै. मारुती पिळणकर चॅरिटेबल ट्रस्ट नवीन कुर्ली च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या सौजन्याने देण्यात आले.