You are currently viewing 19 सप्टेंबर पासून ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन

19 सप्टेंबर पासून ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन

जगभरात चर्चेत असणारा, प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवलेला, वादग्रस्त मात्र तितकाच मनोरंजक, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘मराठी बिग बॉस’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.

19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे. महेश मांजरेकर प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र प्रोमोमध्ये मांजरेकरांचं दर्शन घडल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा