You are currently viewing शिक्षण विभागाचे एक पुढचे पाऊल,..

शिक्षण विभागाचे एक पुढचे पाऊल,..

*शिक्षण विभागाचे एक पुढचे पाऊल,…….*
============== *आतापासूनच नियोजनाला सुरुवात….*
==============
अमरावती विभागातील अमरावती,अकोला, यवतमाळ,बुलढाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातील शाळांमध्ये यावर्षी कसे नियोजन करावे त्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, मुख्याध्यापकांची शिक्षकांची तसेच पालक व शिक्षण प्रेमी लोकांची एक सभा मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी अमरावती नागपूर रोडवरील नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये होत आहे .पुढच्या सत्रापासून शाळा प्रारंभ होणार आहेत. पण या विभागातील शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणांचा विकास व्हावा शैक्षणिक बाबींचा विकास व्हावा त्यासाठी काय धोरण राबवावे यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. खरं म्हणजे अशा प्रकारची सभा आयोजित करून संबंधित अधिकाऱ्यांनी आपली दूरदृष्टी प्रगट केली आहे. खरं म्हणजे प्रत्येक विभागामध्ये नियोजन जर नीट असले तर त्या विभागाचे काम तंतोतंत शंभर टक्के यशस्वी होऊ शकते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे “well planned thing end in good results” याचा अर्थ असा की, तुमचे नियोजन चांगले असले तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही नियोजन करण्यात चुकला तर तुमचे कामही चुकण्याची दाट शक्यता आहे. खरं म्हणजे मी गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत आहे आणि आता तर आयएएस सारख्या राष्ट्रीय स्तरावरील चळवळीमध्ये मी गेल्या २५ वर्षापासून सहभागी आहे आणि मला सातत्याने वाटत राहते की हे शिक्षण विभागातच नाही तर सर्व विभागांमध्ये दृष्टी ठेवून काम करणे गरजेचे आहे .अशी दृष्टी असली तरच आपल्या विभागाचा आपल्या देशाचा आपल्या जगाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल नाहीतर अनेक योजना येतात. कागदावरच राहतात. प्रत्यक्ष जनमानसापर्यंत त्या पोहोचत नाहीत आणि म्हणून अमरावती विभागाने शिक्षण क्षेत्रात उचललेले हे पाऊल निश्चितच अभिनंदनास पात्र आहे .या सभेचे आयोजन माझ्या माहितीप्रमाणे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांची संस्काराची व अभ्यासाची घडी नीट बसवणे हा आहे आणि हा निर्णय खरोखरच अनन्यसाधारण आहे .तो यासाठी की जर बालपणापासून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार झाले योग्य वाटा दाखविण्यात आल्या तर ती मुले जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तर त्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे आज संगणक युग आहे. इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. प्रत्येक कार्यालयात व घरोघरी संगणक आलेले आहेत.या सर्वांचा उपयोग जर खऱ्या अर्थाने करून घेतला तर मला असं वाटते शालेय शिक्षण विभाग तर समोर जाईलच. पण त्याबरोबरच इतरही विभागाला या विभागापासून प्रेरणा घेऊन चांगले नियोजन करता येईल. खरं म्हणजे आता शाळा संपायला आल्या आहेत .पण शाळा संपायच्या आतच पुढच्या वर्षीचे नियोजन करण्याचे ठरवून शिक्षण विभागाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी हे खऱ्या अर्थाने पुढचे पाऊल टाकलेले आहे. एक म्हण आहे की शांततेच्या काळात जे लोक परिश्रम करतात त्यांना संघर्षाच्या वेळेस जास्त परिश्रम करावे लागत नाही .आपण सैनिकांचे उदाहरण घेऊ या .सध्या भारताचे कोणत्याही देशाबरोबर युद्ध सुरू नाही. याचा अर्थ भारतीय सैनिक झोपलेले आहेत असा मुळीच होत नाही . माझे जावई भारतीय सैन्यात कर्नल आहेत आणि माझे चुलत व्याही व्हॉइस एयर मार्शल होते .त्यामुळे सैनिकी कार्य कसे असते याची मला पुरेपूर जाणीव आहे .सैनिकांचा सराव सुरू असतो .युद्ध असो वा नसो .सकाळी उठणे कवायत करणे .फायरिंग करणे. आपली यंत्रसामुग्री नीट ठेवणे .हे सर्व काम युद्धपातळीवर बाराही महिने सुरू असते आणि त्याचाच आदर्श ठेवून शिक्षक विभागाने हा जो चांगला पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो अभिनंदनस पात्र आहे. मी जेव्हा काही वर्षांपूर्वी मुलांना दुसऱ्या वर्गापासून प्रशासकीय सेवेचे एक रुपयामध्ये प्रशिक्षण देणे सुरू केले तेव्हा मला फारसा प्रतिसाद नाही मिळाला. काही लोकांनी माझी टिंगलही केली. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा या पंचवीस वर्षात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आयएएस बाबत जी जनजागृती केली त्याचे प्रत्येक जिल्ह्यात अनुकूल प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. म्हणून अशा प्रकारे जर दूरदृष्टी ठेवून आणि त्या दृष्टीचा प्रत्यक्ष शालेय शिक्षणामध्ये उपयोग करून जर यंत्रणा राबली तसेच यंत्रणा राबविली तर येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्राचे शिक्षण विभागाचे क्षेत्र पालटलेले असेल. आणि म्हणून या सभेचे जे संयोजक आहे तसेच या सभेमध्ये सहभागी होणारे जे आयएएस अधिकारी आहेत उर्वरित अधिकारी आहेत मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत पालक आहेत शिक्षण प्रेमी लोक आहेत त्या सर्वांचे मनापासून स्वागत केले पाहिजे. मराठी पाऊल पडते पुढे आणि त्या उपक्रमाची सुरुवात आपल्या अमरावती विभागातून होत आहे हे खरोखरच नोंदणीय व अभिनंदनीय बाब आहे .
============== प्रा *. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प. 9890967003*

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा