You are currently viewing आम्ही सिध्द लेखिका पुणे विभाग दुसरे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनातील उद्घाटक मा.उषा चांदूरकर यांचे भाषण

आम्ही सिध्द लेखिका पुणे विभाग दुसरे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनातील उद्घाटक मा.उषा चांदूरकर यांचे भाषण

पुणे :

आम्ही सिध्द लेखिकांच्या पुण्यात झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात उदघाटन करताना आपल्या भाषणात उषाताई चांदूरकर म्हणाल्या की मला अरुणाताई ढेरे यांच्या बद्दल नितांत आदर आहे आणि अभिमान वाटतो त्या राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक अशा कोणत्याही विषयावर लिलया बोलणा-या अरुणाताई माझ्या खूप लाडक्या आहेत. त्यांच अस्खलित भाषण ऐकताना त्यांच्या शिरावर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे असे वाटते.

त्यांच भाषण ऐकण्याच्या पूर्वी साहित्याबद्दल आपण बोलायच म्हटल तर सख्यांनो साहित्याची परिभाषा काय असावी याबाबतीय विचार केला तर दोन तीन परिभाषा मला आढळल्या त्यातली एक म्हणजे “वाक्यम् रसात्मकम् काव्यम” ही संज्ञा विश्वनाथांनी केली आहे. तर जगन्नाथांनी म्हटलय “रमणियात प्रतिपादकम शब्दकाव्यम्” पण या दोन्ही व्याख्या जोडून १०० वर्षापूर्वी एक सगळ्यांना समजेल अशी व्याख्या आँर्थर किलरफूस यांनी सुंदर व्याख्या केली आहे, ती अशी की..” लिटरेचर इज दँट वीच एव्हरी मेन अँन्ड वूमन हँव रीटन मेमोरेबली अबाऊट देअर लाईफ” याचा मराठीत अर्थ पाहिला तर समजा आपण रस्त्यावरून जातोय तेव्हा शेकडो लोक त्याच रस्त्यावरुन जात असतात पण
रस्त्याच्या कडेला फुलांनी डवरलेल झाड पाहून सगळ्यांना सौंदर्य
दिसणार नाही आणि ज्यांना सौदर्य दिसत ते सगळेच कविता, लेख, ललित लिहू शकणार नाही. प्रतिभाशक्ती फुलारुन येणारे साहित्य चिरंजीव, शाश्वत आहे, उच्च दर्जाच आहे अस म्हणता येणार नाही. पण या वाडमयामुळे नवनिर्माण करण्याणी इच्छा इतरांचे विचार चक्र सुरु होत असेल, लिहिण्याची प्रेरणा मिळत असेल आणि जर साहित्य लोकाभिमुख असेल तर
त्याला लिटरेचर म्हणता येईल. तशीच आम्ही सिध्द लेखिका या पठडीत मोडतात. अस मला वाटतं.

सख्योंनो “*आईना कभी झूठ नही बोलता परछाई कभी साथ नही छोडती”* तसेच साहित्य हे सुध्दा तो समाजाचा आरसा असते आणि त्या त्या काळी असणारी परिस्थिती, समाजातील वैचारिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचे पडसाद साहित्यावर पडतात. म्हणून तो समाजाचा आरसा म्हणतात. मोगल साम्राज्यामुळे लोक खूप त्रासले होते निराश हताश झाले होते त्याच वेळी समर्थ रामदासांचा दासबोध जन्माला आला आणि त्याचे, व्याख्यान, प्रवचन मुळे लोकांमधे चैतन्य निर्माण झाल. दुसर उदा.आपल्याला क्रांतीकारकांचेही घेता येईल. टिळक, आगरकर, सावरकर, म.गांधी होते. यांच्या साहित्यामूळेच क्रांतिकारक पिढी निर्माण झाली यालाच साहित्याचा प्रभाव म्हणतात. आपण केवळ साहित्याचा प्रभाव म्हणून साहित्य ऐकणार नाही आहोत तर त्यामधे साहित्यला कालमर्यादा असते. त्यामुळेच कालपरत्वे साहित्यात बदल होत जातात आज जे साहित्य लोकांना आवडते ते भविष्यात आवडेल असे नाही मग हे बदल का झाले याचे उत्तर प्रसार माध्यमांची वाढता प्रभाव.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा पगडा. हल्ली अगदी कामवाली,गरीब लोकांनाही इंग्रजीतून मुलांना शिक्षण मिळावं वाटतं पण घरी कोणालाच इंग्रजी येत नाही त्यामुळे कुठलीच भाषा परफेक्ट येत नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून ९७व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. रविंद्र शोभने प्रयत्नशिल आहेतच.

शिक्षणमंत्री केसरकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मी कॅबिनेटमध्ये प्रयत्न करेन ही फार मोठी गोष्ट आहे. त्या पुढे म्हणाल्या माझ *उषाकिरण*हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आम्ही सिध्द लेखिकाचा मोठा हात आहे हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

माझे मि.उद्योजक होते नेहमी विमान प्रवास करायचे मी एकदा त्यांना विचारले की तुम्हाला जीवाची भिंती वाटत नाही का हो,?
तर ते म्हणाले अराईव्हल झालंय,डिपार्चर ठरलेलं आहे सीट कन्फर्म आहे, फक्त बोर्डिंग पास काढायचा आहे.तो काढल्याशिवाय वरती एन्ट्री मिळणार नाही.मग तो पर्यंत आपण एन्जॉय करायला काय हरकत आहे.

संख्यानो मराठी भाषेसाठी मला जे पण करता येईल ते मी तनमनधनाने करणार आहे.

तो माझ्या आयुष्याचा करार आहे.
*आयुष्याचा माझा करार अजून बाकी आहे*
*मावळताना लखलखण्याचा करार अजून बाकी आहे*
*स्वार्थासाठी खोटा करार नाही केला मी कोणाला*
*फाटले जरी वस्त्र तरीही जरतार अजून बाकी आहे*
या शेरांवर टाळ्याच्या प्रचंड कडकडाटात उषाताईंनी आपलं अनमोल वक्तव्याचा समारोप केला.

शब्दांकन..सौ.मानसी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा